बदलाची शिल्पकार : डॉ. तरू जिंदल
नंदिनी सातारकर
०५ ऑगस्ट २०२०
‘हॉं, ये मुमकिन है’ हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं. डॉ. तरू जिंदल यांचं हे आत्मकथनात्मक पुस्तक आहे. ही आहे एक सत्यकथा - खरं म्हणजे एक विजयगाथा. हा आहे डॉ. तरू जिंदल यांचा प्रेरणादायी प्रवास. सर्वसामान्य माणसांबद्दल वाटणारा जिव्हाळा आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यांचं दर्शन या पुस्तकातून घडतं. एका तरुण स्त्री डॉक्टरच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक प्रवासाचा हा आलेख. या काळात दैनंदिन घडामोडी आणि विचा…